Skip to content

Interview with Sri Vivek Godbole, Founder, Sri Krishna Yajurved Pathshala, Satara.

The following interview was carried out by the eCoexist team, last year in 2008. The aim of it was to clarify the scriptural aspects of the festival and understand the links between Nature and Ganesh Chaturthi. Sri Vivek Godbole is a Vedic scholar specialising in the Taittareya branch of the Sri Krishna Yajur Veda. He is the founder of a Vedic school in Satara, Maharashtra and a staunch lover of Nature himself. His thoughts on Ganesh Chaturthi have inspired the efforts of eCoexist in this regard. They will also clarify completely that there is no conflict whatsoever in the scriptural practise of Ganesh worship and the efforts to conserve our environment.
Q: Could you please explain the origins of the Ganesh Chaturthi festival?
A: It is very important to understand the roots of the Ganesh Chaturthi festival to be able to taste the true joy of celebrating it.

‘Gana’ stands for collective and ‘Ganapati’ is the one who brings people together, who presides over them. This includes all kinds of people – scholars, artists, athletes, businessmen and labourers. He is the one who unites human society.

This is in fact the true meaning of ‘devotion’. That which creates unity within individuals and with the Universal energy.

Vivek bhauGanpati is also considered the deity of knowledge ‘jnandatri’ – the one who bestows knowledge and understanding. This is why it is necessary that we understand what we are doing and why, so that we receive his gift of knowledge.

The beginnings of the Ganesh festival can be traced back to a time when most of the populations of India lived by a source of water, usually rivers. According to the Indian calendar, towards the end of the month of Jhyestha, when the constellation of Mriganakshatra is sighted, we begin to see the first signs of the rains. This is when a series of festivals, Maati che Tyauhaar, respecting the Earth begin.

The first of these is the festival of Bendur, which falls in the month of Aaashadh. Following this comes Naag Panchami, in the month of Shraavan, when we worship the snake. These festivals express our gratitude to all the elements of Nature, those that we see as directly beneficial as well as those that we may fear. Finally, in the month of Bhadrapada, on the fourth day arrives Ganesh Chaturthi.

In ancient years people used to bathe in the rivers. In the monsoon season, the waters of the rivers are fresh and clean and the banks of the river rich with freshly deposited fertile soil. People would take this fresh sediment and worship it. This wet fresh and fertile soil was given a form by each devotee themselves. Each one of us has an artist within us and making the Ganesh idol was itself a form of worship, of experiencing and visualising the divinity in the soil.

The worship of Nature, the Earth, and the species that inhabit the Earth, is the recognition of the existence of the same elements within ourselves. All living beings are made of the same five elements and these festivals recognise and acknowledge this inherent Unity.

This was the beginning of Ganesh Chaturthi.

Q: What is the original process of this worship?

A: Once Ganpati arrives home, there is an outbreak of joy and excitement in the household, and questions about how best to welcome him. Whatever we choose to do, it is important that it is done with love, devotion and true feeling. It is only through such feeling that we truly experience him within us. We invite him into our homes, to be part of our family. We install him in our hearts. We offer him sacred sounds and pray that the elements within us come alive in him as well. Recognising that this mound of earth is, in its essence, divine, we pray to it to bestow upon us joys and to take away sorrows.

Q: Can you comment on the materials used for worship?

A: In the offerings that we make to Sri Ganesh, each item has its own significance and is all symbolic of our deep links with Nature. Originally, all of these came directly from Nature and did not have any chemicals in them. Turmeric powder and natural kumkum made with turmeric, sandalwood paste and rice grains make up the basic offerings in any pooja. Each of these substances have a medicinal effect on the body, turmeric is an antiseptic, kumkum and sandalwood are cooling. Having recognised the Unity between ourselves and the diety we offer the same substances to him as well as apply them to ourselves.
The practise of applying kumkum to the forehead is also a ‘darshan’ of the Sun God, the forehead of our body is like the vast horizon on which this fiery ball of light arises in the point between the eyebrows. In this way, offering kumkum to the Ganesh idol is an offering of light.
The other offering of great importance in a Ganesh pooja is the Durva grass. This grass which grows in great multitudes also strengthens ones memory. Since Ganesha is the lord of knowledge, the Durva grass is preferred by him.
The ‘modak’, made of jaggery, rice and coconut is another one of his favourites. This sweet dish which is boiled rather than fried, is nourishing and does not harm your health in any way.

Q: Why is it necessary to do a pooja?

A: Each devotee needs to find his or her own way of prayer, unique to his individual personality. The efforts that we put into this celebration are all a form of doing pooja. The talents that we offer in display to the idol are also a form of pooja. Pooja finally is a communication between us and the Universal energy. We offer our talents and efforts as a form of gratitude for what we have received.
Pooja is ‘darshan’ not ‘pradarshan’. It is the vision of the presence of the Lord within us, not the display of our accumulations and achievements.

Q: What should the size form and colour of the idol be?

A: The original practise of making an idol oneself also limited the size of the idol. It could never have been 10 or 15 feet high. It must have been an idol the size of our palm which one could easily carry home cradled in our arms. This idol may have hardly been painted in bright colours, except with the natural substances available at hand, such as turmeric and kumkum. It was humbly decorated with flowers and love. As for colours, the lord is coloured with our devotion and returns this love manifold!

Q: How has the form of the Ganesh festival changed over the years and what were the forces that led to this change?

A: The initial practise of making ones own idol slowly started getting refined with the involvement of the potter community. The small idol that was made from fresh earth by families themselves would start to develop cracks within a day and a half and then it would be taken back to the rivers and returned to where it came from. As the material the idol was made from became more and more sturdy, the festival duration also increased to three, five, seven and then ten days as people became attached to their idols and wished to prolong the festivities. When Gauri came to be attached with the festival the five day festival continued to seven days and Gauri was immersed along with Ganpati. Finally, several communities would observe the Ananta fast and the festival went on until Ananta Chaturdashi to become a ten day festival. Along this path of evolution, the simple home made idol became fancier, received colours and decorations and finally the natural clay was replaced by Plaster of Paris, as it offered several conveniences to the sculptors.
The original simple intimate Ganesh pooja, then took on a social angle and extended beyond the house and family to the neighbourhood and the community. The art of making idols took on a commercial significance as it supplemented the income of the potter community and finally businesses developed only around the making of Ganesh idols.
With the advent of commerce, the attitudes of devotees have also become one of bargaining with the Lord and prayers are now done with expectations of recieving something in return. True devotion involves complete surrender to the Universal will and inner offerings of gratitude. A recognition of the unity and beauty of all of creation.

Q: How do we address the environmental issues that arise from the Ganesh festival?

A: We must all become aware of the nature of true bhakti. Devotion does not mean being ignorant of the impacts of our actions. After conducting a beautiful pooja at home if we are unconcerned about the state of the river in which we want to immerse our idols then how are we worshipping the Lord of Knowledge? What knowledge have we gained?
We need to look for the right choices to make. Choosing an idol that is made of natural clay and demanding it will ensure that these are made available in the markets. Shouldn’t your devotion be so deep that you ensure that no living being or natural element is harmed by your actions? Rather, even if you didn’t bring a Ganpati idol home every year, he is not going to be upset with you. If one has expectations of earning merit one must ensure that we perform meritorious actions. Make choices that spread harmony amongst the human and natural world, you don’t need loudspeakers to communicate with the Lord. Activities that damage our own health and those of others do not connote devotion. Education involves reflection on our own actions and choices. Worship rituals should bring us joy, peace and freedom from anxiety.
If you immerse your idol in your home, there is no question of conflict with any tradition. The idea of immersion is to ensure that what has come from the earth returns to the earth. You can ensure that the water you use for immersion is free from any waste and clean. Once the idol has dissolved this water can be offered to the plants in your own garden, and in this way Sri Ganesh will have returned to the Earth where he came from.

The use of thermocol and plastic in decorations also needs to be avoided. We seem to have come further and further from natural materials in the way we live today. At least in matters of faith let us make an effort to return to Nature.

Similarly, the nirmalya generated through the rituals could be converted into compost and fed as nutrition to the plants around you. We do this regularly ourselves in our Ved pathshala in Satara. This can only be beneficial to us and those around us.

Q: What does the form of the Ganpati symbolise?

A: If you observe the body of Ganesha, it consists of a human form with the head of an elephant. Often people wonder about this strange combination. Reflect upon the nature of the elephant. It is an herbivorous animal that is extremely strong. It lives in a community and travels with the female guiding it. Humans share several qualities with the elephant. It enjoys a fantastic memory. Research is now showing that elephants are capable of expressing emotions such as joy, sorrow and deep loyalty within its communities. They even mourn for those who have died among them.
The form of Ganesha is one that unites humanity with the rest of creation. The human world and the animal world. That symbolises strength and intelligence. The myths that go along with the origin of this unique form involve a story between Shiva and Parvati. Yet it is important to go behind the myth and understand its deeper meanings.

Ganpati has four hands. One is held out in the ‘abhay’ mudra which bestows fearlessness. Yet to acquire fearlessness, we need to unite as a community. The idea of Sri Lokmanya Tilak to make this a social event was to create this unity amongst people.

The vehicle of Ganesha is the mouse. Why the mouse? The mouse has ability to break down substances into their tiny parts. We need to develop an intelligent mind that is capable of understanding things in detail, which enters into the depth of matters.

Ganesha also carries snake around his waist, which is a symbol of the energy which resides in all human beings. This energy can be used both beneficially or for destructive purposes. The position of the snake at the navel of the murti is a symbol of ‘vyaan’ an aspect of Vayu – the element of air within the body.

There are several verses praising the glory of Sri Ganesh. Learn them, understand them and sing them with your own voices. This will bring you the grace you seek.

Ganpati is connected to the natural cycle. When we bring this small mud idol home, we offer it all our love and devotion. This idol which collects our positive thoughts and energies is then returned to the earth, either through the rivers or even at home, it carries our goodwill to others and to our environment. We then are united through the earth, the waters and through our goodwill. We need to bring this awareness back into the way we perform our rituals.

May we pray to Sri Ganesha that we receive the intelligence to make the right choices in our lives. To choose the right quantities of the appropriate substances. Ganpati is not about competing with each other. May we pray that we be able to return to simpler and more natural ways of being, and in doing so we are able to reconnect with Nature. Being educated is different from being cultured. Being cultured involves taking responsibility. True devotion can never be quantified by outer displays. It is the one thing that takes us deeper within to our own inner joy.

 


 

गणेश चतुर्थीची नैसर्गिक उत्पत्ती : वैदिक पंडितांबरोबर एक संवाद
श्री विवेक गोडबोले (संस्थापक – श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा, सातारा) यांची मुलाखत.

(ही मुलाखत इकोएक्झिस्ट टीमने २००८ मध्ये घेतली होती. गणेशोत्सवामागील शास्त्र तसेच निसर्ग आणि गणेश चतुर्थी यांच्यातील संबंध समजून घेणे हा या मुलाखतीमागील उद्देश होता.)

श्री विवेक गोडबोले हे एक वैदिक पंडीत आहेत. श्रीकृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरेय शाखेचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. ते महाराष्ट्रातील सातारा येथील एका वैदिक शाळेचे संस्थापक आणि निसर्गप्रेमी आहेत. गणेशचतुर्थी या विषयावरच्या त्यांच्या विचारांनी या संदर्भात इकोएक्झिस्टच्या प्रयत्नांना प्रेरणा दिली आहे.

ते हे पूर्णपणे स्पष्ट करतात की गणेशपूजेच्या शास्त्रोक्त पद्धतीमध्ये आणि आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये कोणताही विरोधाभास किंवा परसपरसंघर्ष नाही.

 

प्रश्न: गणेशचतुर्थी उत्सवाची उत्पत्ती किंवा सुरवात कशी झाली, ते कृपया स्पष्ट कराल का?

उत्तर: गणेशोत्सव साजरा करण्यामागचा खरा आनंद जाणण्यासाठी त्यामागचा मूळ उद्देश समजून घेणे फार महत्वाचे आहे.

‘गण’ म्हणजे समूह आणि ‘गणपती’ म्हणजे लोकांना एकत्र आणणारा, त्यांचे नेतृत्व करणारा.
यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो – विद्वान, कलाकार, खेळाडू, व्यापारी आणि मजूर.
‘गण – पती’ हा खरंतर समस्त मानवजातीला एकत्र आणतो.

खरं सांगायचं तर हा ‘भक्ती’चा भावार्थ आहे – ज्यामुळे व्यक्तींमध्ये एकता आणि सार्वत्रिक उर्जा निर्मिती होते.

गणपतीला बुद्धीची देवता – ‘ज्ञानदात्री’ देखील मानले जाते – जो ज्ञान आणि जाणीव प्रदान करतो. म्हणूनच आपण काय करतो आहोत आणि का करतो आहोत हे समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला योग्य ती माहिती – ज्ञान मिळेल.

गणेशोत्सवाची सुरुवात अशा काळात झाली जेव्हा भारतातील बहुतेक लोक जलस्त्रोतांजवळ राहत होती, सामान्यतः नद्या. भारतीय दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शेवटी, जेव्हा मृगनक्षत्र दृष्टीस पडते, तेव्हा आपल्याला पावसाची लक्षणं दिसू लागतात. यातूनच पृथ्वीमातेचा आदर करणाऱ्या सणांची मालिका (माटीके त्यौहार) सुरू होते.

यातील पहिला सण – बेंदूर हा आषाढ महिन्यात येतो. यानंतर श्रावण महिन्यात नागपंचमी येते, जेव्हा आपण नागाची पूजा करतो. हे सण निसर्गातील अशा घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात,जे आपल्याला प्रत्यक्ष लाभदायक वाटतात आणि ज्यांची आपल्याला भीतीही वाटू शकते.
यानंतर भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (शुक्ल चतुर्थी) गणेश चतुर्थी येते.

प्राचीन काळी लोक नद्यांमध्ये स्नान करायचे. पावसाळ्यात नद्यांचे पाणी ताजे आणि स्वच्छ असते. नदीकिनारे नव्याने जमा झालेल्या सुपीक मातीने समृद्ध असतात. लोक हा ताजा गाळ, ओली माती घेऊन त्याची पूजा करत. या ओल्या, ताज्या आणि सुपीक मातीला प्रत्येक भक्ताने स्वतः एक रूप दिले. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये एक कलाकार असतोच, त्यामुळे गणेशमूर्ती बनवणे ही एक प्रकारची उपासना आहे, ज्यामुळे मातीतील देवत्व अनुभवता येते

निसर्गाची, पृथ्वीची आणि पृथ्वीवर राहणार्‍या प्रजातींची उपासना म्हणजे आपल्यातील समान घटकांच्या अस्तित्वाची ओळख. सर्व सजीव त्याच पंचतत्वांनी बनलेले आहेत. आपले सण या उपजत एकात्मतेला मान्यता देतात.

गणेशोत्सवाचा उगम या अशा संकल्पनांमधून झाला.

प्रश्न: गणरायाच्या उपासनेची मूळ प्रक्रिया काय आहे?

उत्तर: गणपती घरी आला की, घराघरात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण असते. आपल्या लाडक्या गणोबाचे स्वागत कसे करायचे, हा प्रश्न पडतो. आपण जे काही करू ते प्रेम, भक्ती, श्रद्धापूर्वक आणि मनोभावे करणे महत्त्वाचे आहे.
अशा उदात्त भावनांतूनच आपण त्या प्राणशक्तीचा आपल्या आत अनुभव घेतो. आपण गणरायाला आपल्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी घरी आमंत्रित करतो. त्याला आपल्या हृदयात स्थापित करतो. शंख आणि घंटानाद करत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो.
मातीचा असला तरी दैवी आहे हे ओळखून त्याने आपल्याला आनंद द्यावा (सुखकर्ता)आणि आपले दु:ख दूर करावे (दुःखहर्ता) यांसाठी आपण प्रार्थना करतो.

प्रश्न: पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल थोडं सांगाल का?

उत्तर: आपण श्रीगणेशाला अर्पण करतो त्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व असते. या वस्तू निसर्गाशी असलेल्या आपल्या संबंधांच्या प्रतीक आहेत. मूलतः या सगळ्या वस्तू थेट निसर्गाकडून घेतलेल्या आहेत आणि त्यात कोणतेही रसायन (केमिकल) नसते. हळद आणि (हळद, चंदन आणि तांदळाच्या दाण्यांनी बनवलेले) नैसर्गिक कुंकू हे कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम अर्पण केले जाते. यातील प्रत्येक घटकाचा, पदार्थाचा शरीरावर औषधी परीणाम होतो. हळद ही जंतुनाशक आहे, कुमकुम आणि चंदन शीतलता देणारे आहे. आपण आणि आपला बाप्पा यांतील एकतत्वाचा विचार करता, आपण त्याला तेच पदार्थ देऊ जे आपण स्वतःला लावू किंवा स्वतः साठी वापरू.

असं म्हणतात की कपाळाला कुंकु लावणं म्हणजे सूर्याचे ‘दर्शन’ घेणं. आपला भालप्रदेश विस्तीर्ण क्षितीजासारखा आहे, जिथे भुवयांच्या मध्यभागी हा ज्वलंत प्रकाशाचा गोळा उभा राहतो. तद्वतच गणेश मूर्तीला कुंकू वहाणे म्हणजे या तेज प्रकाशाचा नैवेद्य अर्पण केल्यासारखे आहे.

गणपती पूजेतला दुसरा महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे दुर्वा. मोठ्या संख्येने वाढणारे हे पवित्र गवत स्मरणशक्ती मजबूत करते. गणेश हा विद्येचा स्वामी असल्याने दुर्वांच्या जुडीला प्राधान्य दिले जाते.

गूळ, तांदूळ आणि नारळापासून बनवलेला ‘मोदक’ हा गणपतीचा एक आवडता पदार्थ आहे. (तळलेल्या मोदकाऐवजी) उकडलेला हा गोड पदार्थ पौष्टिक तर आहेच, पण हा आपल्या आरोग्यास कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही.

प्रश्न: पूजा करणे का आवश्यक आहे?

उत्तर: प्रत्‍येक भक्ताला प्रार्थनेचा त्‍याचा स्‍वत:चा मार्ग शोधण्‍याची आवश्‍यकता असते, ही प्रार्थना त्या व्यक्तीपुरती वेगळी, अद्वितीय असते
या उत्सव साजरा करण्यासाठी आपण जे काही करतो, ते पूजेचेच प्रकार आहेत. मूर्ती घडवणं आणि सजावट हे कलागुणसुद्धा पूजेचंच एक रूप आहे.

शेवटी पूजा म्हणजे काय? तर आपली आंतरीक आणि चराचरात पसरलेली आत्मिक ऊर्जा यांच्यातील संवाद. आपल्याला जे जे मिळाले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आपली प्रतिभा आणि प्रयत्न अर्पण करतो.
पूजा म्हणजे ‘दर्शन’! ‘प्रदर्शन’ नव्हे. हे आपल्यातील परमेश्वराच्या अंशाचे दर्शन आहे आणि आपल्या संचयाचे आणि कर्तृत्वाचे प्रदर्शन नाही.

प्रश्न: मूर्तीचा आकार आणि रंग कसा असावा?

उत्तर: मूर्ती घडवण्याच्या मूळ पद्धतीत मूर्तीचा आकार मर्यादित होता. ती कधीही १० फुट किंवा १५ फूट उंच घडवणं शक्य नसायचं. मूर्ती छोटीशीच, साधारण आपल्या तळहाताएवढी – जी आपल्या हाताचा पाळणा करून सहज घरी नेता येत असे. हळद आणि कुंकू यांसारखे नैसर्गिक पदार्थ वगळता ही मूर्ती क्वचितच इतर चमकदार रंगात रंगवली जात असावी. सजावट साधीच फुलांची असायची आणि प्रेमाने व्हायची. रंगांबद्दल बोलायचं झालं तर, बाप्पा आपल्या भक्तीने रंगून जातात आणि ते हे प्रेम आपल्याला अनेक पटींनी परत करतात!

प्रश्न: गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाचे स्वरूप कसे बदलले आहे आणि हा बदल घडायला कोणते घटक कारणीभूत ठरले आहेत?

उत्तर: कुंभार समाजाच्या सहभागामुळे स्वतःची मूर्ती स्वतः बनवण्याची प्रथा हळूहळू बंद होऊ लागली. ताज्या मातीने घडवलेल्या लहानशा मूर्तीला दीड दिवसातच भेगा पडू लागत आणि मूर्ती नदीमधे विसर्जित केली जाई; म्हणजेच माती जिथून आली तिथे परत येई.

मात्र नंतर ही माती, इतर सामग्री जसजशी टिकाऊ आणि मजबूत होत गेली, तसतसा उत्सवाचा कालावधी देखील तीन, पाच, सात आणि नंतर दहा दिवसांपर्यंत वाढला. लोक मूर्तींशी भावनिकदृष्ट्या बांधले गेले आणि उत्सवाचा कालावधी वाढवू लागले. गौरींचा सण गणेशोत्सवाला जोडून येतो, त्यामुळे पाच दिवसांचा उत्सव सात दिवस चालतो आणि गणपतीसह गौरींचेही विसर्जन होते.
शेवटी, काहीजण अनंताचे व्रत पाळत, त्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसवत. त्यामुळे हा उत्सव दहा दिवसांचा उत्सव बनला. उत्क्रांतीच्या या मार्गावर, साध्या घरगुती मूर्तीला रंग आणि सजावटीची जोड मिळाली. हळूहळू नैसर्गिक मातीची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली, कारण ही माती वापरून मूर्ती घडवणे मूर्तिकारांना सोयीचे होते.
मूळच्या साधी वैयक्तिक आणि जिव्हाळ्याच्या या सणाला पुढे सामाजिक आयाम लाभला. त्यामुळे घर आणि कुटुंबापलीकडे जाऊन हा सण शेजार आणि समाज, असा विस्तारला. कालांतराने मूर्ती बनवण्याच्या कलेला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले. हा बदल. कुंभार समाजाच्या उत्पन्नाला पूरक ठरला आणि शेवटी गणेश मूर्ती घडवणे हा एक व्यवसाय झाला.

यात पुढे व्यापारी सामील झाले. भक्तांची वृत्तीदेखील हळूहळू सौदेबाजीची होऊ लागली. आताशा काहीतरी मोबदला मिळेल या अपेक्षेने पूजाअर्चा व प्रार्थना केली जाते.

खर्‍या भक्तीम्हणजे या तत्वाला पूर्णपणे शरण जाणे आणि त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. सर्व सृष्टीच्या एकतेची आणि सौंदर्याची हीच खरी ओळख आहे.

प्रश्न : गणेशोत्सवाच्या सध्याच्या स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करायचे?

उत्तर: आपण सर्वांनी खऱ्या भक्तीचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. आपल्या कृतींच्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असणे, म्हणजे भक्ती नव्हे. घरी सुंदर सजावट आणि पूजा केल्यानंतर ज्या नदीत आपल्या मूर्ती विसर्जित करायची आहे, त्या नदीच्या स्थितीबद्दल जर आपल्याला चिंता नसली तर ज्ञानाच्या या देवतेची खरी पूजा आपण कशी करणार आहोत? आपल्याला सणातून कोणते ज्ञान मिळाले?

आपल्याला योग्य पर्याय निवडण्याची गरज आहे. नैसर्गिक मातीपासून बनवलेल्या मूर्तींची वारंवार मागणी आणि निवड केल्यास बाजारात त्या निश्चितच उपलब्ध होतील.

तुमची भक्ती इतकीही उथळ नसावी की तुमच्या कृतीमुळे कोणत्याही सजीवाला किंवा नैसर्गिक घटकाला इजा होईल. असे होणार नाही याची तुम्ही खात्री बाळगता का?
खरंतर, तुम्ही दरवर्षी नवीन मूर्ती आणली नाही, म्हणून बाप्पा काही तुमच्यावर नाराज होणार नाही.

काहीतरी ‘प्राप्त’ व्हावे, अपेक्षा असेल तर आपण योग्य ती कृती करत आहोत हे सुनिश्चित केले पाहिजे. मानवी आणि नैसर्गिक जगामध्ये समतोल साधणाऱ्या निवडी करा. तुमच्या लाडक्या बाप्पाशी संवाद साधायला लाऊडस्पीकरची गरज नाही. आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी भक्ती दर्शवत नाहीत. आपल्या कृती आणि निवड यांमधे आपल्या शिक्षणाचे, संस्कारांचे प्रतिबिंब दिसून येते. पूजाविधीनी आपल्याला आनंद, शांती आणि चिंतांपासून मुक्ती मिळायला हवी.

आपल्या घरी मूर्तीचे विसर्जन करणे म्हणजे परंपरेला विरोध करणे नव्हे. विसर्जनाचा मूळ हेतू म्हणजे निसर्गाकडून आपण जे घेतले आहे ते निसर्गाला परत देणे. तुम्ही विसर्जनासाठी वापरत असलेले पाणी कचरामुक्त आणि स्वच्छ असल्याची खात्री करून घेऊ शकता. मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी तुमच्या स्वतःच्या बागेतील झाडांना अर्पण करता येईल आणि अशा प्रकारे गणेशतत्व जिथून आले होते, त्या पृथ्वीवर (मातीत) परत जाईल.

सजावटीत थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापरही टाळावा. आज आपण ज्या प्रकारे जगतो ते बघता आपण निसर्गापासून खूप दूर झालो आहोत असे जाणवते. किमान श्रद्धांच्या बाबतीत तरी आपण निसर्गाकडे परत वळण्याचा प्रयत्न करू या.

त्याचप्रमाणे, पूजेनंतर गोळा होणारे निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाऊ शकते आणि आपल्या सभोवतालच्या झाडांना पोषकतत्व म्हणून दिले जाऊ शकते. सातारा येथील आमच्या वेदपाठशाळेत आम्ही हे खत नियमितपणे तयार करतो. हे केवळ आपल्यासाठी नव्हे तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठीसुद्धा फायदेशीर ठरू शकते.

प्रश्न: गणपती कशाचे प्रतीक आहे?

उत्तर: आपण गणेशाचे शरीर पाहिल्यास, त्यात हत्तीचे डोके असलेले मानवी स्वरूप आहे. बहुतेक वेळी लोकांना या विचित्र संयोजनाबद्दल आश्चर्य वाटते. हत्तीच्या स्वभावाचा विचार करा. हा एक शाकाहारी, बलवान आणि समुदायात रहाणारा प्राणी आहे आहे. हत्ती नेहमी कळपात राहतात आणि प्रमुख मादीच्या मार्गदर्शनाप्रमाणे कालक्रमणा करतात. हत्तीमध्ये मानवाचे अनेक गुण असतात, जसे की विलक्षण स्मरणशक्ती. संशोधन हे सांगते की हत्ती आपल्या समुदायांमध्ये आनंद, दु:ख आणि खोल निष्ठा यासारख्या भावना व्यक्त करण्यास सक्षम आहेत. ते मरण पावलेल्यांसाठी शोकही करतात.

गणेशाचे हे रूप हे माणूस आणि सृष्टीला एकमेकांशी जोडणारे आहे – मानवी जग आणि प्राणी जग एकत्र आणणारे. हे रूप म्हणजे सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. या अनोख्या स्वरूपाच्या उत्पत्तीच्या मिथकांमध्ये शिव आणि पार्वती यांची कथा समाविष्ट आहे. या मिथकांच्या मागे दडलेला सखोल अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.

गणपतीला चार हात असतात. त्यातील एक निर्भयता प्रदान करणार्‍या ‘अभय’ मुद्रेमध्ये आहे. हा गुण प्राप्त करण्यासाठी, आपण एक समुदाय म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना लोकमान्य टिळकांची सामाजिक एकता निर्माण करणे हीच संकल्पना होती.

गणेशाचे वाहन उंदीर आहे. उंदीर का? तर पदार्थांचे लहान भागांमधे कणांमध्ये विभाजन करण्याची क्षमता त्यांच्यात असते. आपल्यालाही बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी गोष्टींच्या तपशीलात जाऊन त्या-त्या विषयाची खोली समजून घेण्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे.

गणेशाने आपल्या कमरेभोवती नाग धारण केला आहे, हे सर्व मानवांमध्ये असणाऱ्या ऊर्जेचे प्रतीक आहे. ही उर्जा फायदेशीर किंवा विनाशकारी दोन्ही कारणांसाठी वापरली जाऊ शकते. मुर्तीच्या नाभीवर सापाची स्थिती हे ‘व्यान’ (शरीरातल्या वायूचा एक पैलू –पंचमहाभूतातील वायूतत्व) चे प्रतीक आहे.

गणपतीची स्तुती करण्यासाठी अनेक स्तोत्रं आणि आरती आहेत. त्या शिका, समजून पाठ करा आणि तुमच्या स्वतःच्या आवाजात गा. यामुळे बाप्पाची तुमच्यावर कृपा राहील.

गणपतीचा सण निसर्गचक्राशी जोडलेला आहे. मातीची ही छोटी मूर्ती घरी आणल्यावर आपण सर्व प्रेम आणि भक्ती अर्पण करतो. आपले सकारात्मक विचार आणि ऊर्जा एकत्र आणणारी ही मूर्ती नंतर नद्यांमधून (किंवा घरातूनही) परत निसर्गाकडे येते, हे इतरांसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी सदिच्छाकारक आहे. आपण पृथ्वी आणि जल यांच्याशी आपल्या सद्भावनेद्वारे एकरूप होतो. आपण आपले विधी ज्या पद्धतीने करतो त्यामध्ये ही जाणीव पुन्हा जागृत करणे, गरजेचे आहे.

आपल्या जीवनात योग्य निवड करण्याची, योग्य निर्णय (योग्य ते, योग्य मात्रेत) घेण्याची बुद्धी आपल्याला मिळावी म्हणून आपण श्री गणेशाला प्रार्थना करूया. गणपती म्हणजे एकमेकांशी स्पर्धा करणे नव्हे. आपण प्रार्थना करूया की आपण सुलभपणे नैसर्गिक मार्गांकडे परत येऊ शकू आणि असे केल्याने आपण निसर्गाशी पुन्हा संपर्क साधू शकू. सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुसंस्कृत होण्यात जबाबदारी घेणे समाविष्ट आहे. खरी भक्ती कधीच बाह्य प्रदर्शनाद्वारे मोजता येत नाही. खरी भक्ती आपल्याला सखोल आंतरिक आनंद देते.

rice ganesha

Click here to find a collection center near you

X