Skip to content

शाडूमातीचे नूतनीकरण आणि पुनर्वापर मोहिमेबद्दल

गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर शाडूमाती आणि चिकणमातीचा गाळ गोळा करून त्याचे मूर्तिकारांना पुनर्वितरण करण्यासाठी ही शहरव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. आमचे मुख्य कार्य हे सुनिश्चित करणे आहे की ही माती स्वच्छ ठेवली गेली आहे आणि काळजीपूर्वक साठवली आहे जेणेकरून मूर्तिकारांना ती पुन्हा वापरता येईल. आम्हाला असे मूर्तिकार शोधावे लागतील जे अशी शाडूमाती अथवा चिकणमाती स्वीकारतील आणि पुढील वर्षी गणेशमूर्तींच्या उत्पादनात या मातीचा पुनर्वापर करतील. 

२०२२ मध्ये आम्ही पुणे आणि नाशिकमध्ये याची अंमलबजावणी करणार आहोत. 

10

मूर्तीचे विसर्जन

घरच्या घरी विसर्जन: ज्या पाण्याच्या बादलीत विसर्जन केले जाते तिच्या तळाशी कापडाचा तुकडा ठेवून मातीचा गाळ गोळा केला जाऊ शकतो. त्यानंतर त्याला वाळवून, त्याच कापडात गुंडाळून आमच्या संकलन केंद्रावर हस्तांतरीत केला जाऊ शकतो. 

सामाजिक / गृहसंस्था: सामाजिक अथवा गृहसंस्थांमधे संकलनाचे दोन स्तर असू शकतात - वैयक्तिक आणि सामूहिक - सार्वजनिक मूर्ती विसर्जन करताना त्या मूर्तींबरोबर इतर साहित्य मिसळू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

नदीकाठी: नदीकाठी मातीच्या मूर्ती पाण्यात बुडवून मग बाहेर काधून बाजूला ठेवाव्या आणि मातीच्या गाळात रूपांतरित न करता जशा आहेत तश्याच बाजूला एकत्र करून ठेवाव्या. मूर्ती कारागिरांना परत केल्या नंतर मूर्तिकार या मूर्तींना गाळात रूपांतरित करून त्याचा पुनर्वापर करु शकतात. 

वेगळे करणे आणि संकलन करणे

चिकणमाती गाळ खाली दिल्याप्रमाणे संकलित केला जाऊ शकतो:

१. प्रत्येक सोसायटीमधील रहिवाशी सोसायटीमधे एका विशिष्ट जागी गोळा करू शकतात.

२. संपूर्ण शहरातील पुर्वनियोजित संकलन केंद्रांवर.

३. गणेशोत्सवादरम्यान ठरविलेल्या दिवशी.

याची खात्री करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे

१. गाळ स्वच्छ आहे आणि त्यात इतर सेंद्रिय कचरा नाही जसे की फुले.

२. वेगवेगळ्या चिकणमाती एकत्र मिसळल्या गेल्या नाहीत.

३. पीओपी, कागद आणि शेणाच्या बनविलेल्या मूर्ती मातीच्या गाळात मिसळल्या जात नाहीत.

8

वाहतूक आणि पुनर्वितरण

या मोहिमेत दोन महत्त्वाचे घटक आहेत - जे मातीचा गाळ देतील आणि ते जे असा गाळ पुन्हा वापरण्यासाठी स्वीकारतील. अशी संकलित केलेली माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी एकत्र गोळा करून पोहोचवण्यासाठी त्याची वाहतुक करावी लागते. संकलनाच्या दोन दिवशी हे करण्याकरिता टेम्पोची आवश्यकता असेल.

मातीचा गाळ दान करणे

तुम्ही तुमच्या मातीच्या मूर्तींचा गाळ मूर्तिकारांद्वारे पुन्हा वापरण्यासाठी योगदान देऊ इच्छिता ?

कृपया हा अर्ज भरा -->

मातीचा गाळ स्वीकारणे

पुणे, पेण आणि मुंबईतील मूर्तिकारांना या मातीच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी आणि तिचा पुनर्वापर करण्यासाठी त्यांची वचनबद्धता मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.

ही माती स्वीकारून सभासदांना तिचे वाटप करण्यासाठी विविध शहरातील गणेश मूर्तिकार संघटनांबरोबर संपर्क साधण्यात आला आहे.

मातीचा गाळ मूर्तिकारांना परत दिला जाईल, विनामूल्य ! ... 

पुणे

१. बाल कल्याण संस्था, औंध

२. ओंकार साळुंखे

३. सुदन शिंदे

४. चेतन बढे

५. प्रकाश मोहन

६. अक्षय

७. स्वप्निल

८. प्रशांत देसाई, गणेश मूर्तिकार संघटना 

पेण

१. सुभाष कुंभार

२. मयुरेश्वर 

३. राज पाटील

४. हर्षद

नाशिक 

१. हेमंत जोरवर, संगमनेर

2.

पुण्यातील संकलन केंद्रे

मराठी